● पिंपळे गुरव येथील सुयोग कॉलनी व विनायक नगर महिला मंडळाचा महिलांसाठी अभिनव उपक्रम.
● महाराष्ट्राची परंपरा, सांस्कृतिक वारसा जपण्याचा नवीन पिढीसमोर आदर्श.
पिंपरी, दि.२२ :- पिंपळेगुरव येथे नागपंचमी निमित्त प्रिती मराठे यांच्या संकल्पनेतून आपली महाराष्ट्राची परंपरा जपत विनायक नगर व पिंपळे गुरव येथील सुयोग कॉलनी महिला मंडळाने महिलांचा नागपंचमीचे पारंपारिक खेळ खेळून आपली परंपरा जपण्याचा व येणाऱ्या नवीन पिढीला या खेळण्याबद्दल माहिती देण्याचा एक कौतुकास्पद उपक्रम केला.
या खेळामध्ये ५४ महिलांनी सहभाग घेतला होता. सर्व महिला खणाच्या साड्या नेसून तर लहानग्या मुलींनी नऊवारी साडी नेसून पारंपारिक वेशभूषा करून गोल रिंगण करणे, फेर धरणे, झिम्मा खेळणे व विविध प्रकारच्या फुगडी खेळणे व झोका खेळून नागपंचमी हा सण मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रिती मराठे,शताब्दी फनसे,करुणा खोपडे, शालिनी यादव, दीप्ती कुलकर्णी,उज्वला पाटील, कल्पना वनशीव, आशा आव्हाड, जयश्री जंगम, सीमा कांबळे, अपर्णा शेंडे, नयन शिंदे, अवनी शिंदे, अंजली डावके, प्रिया भोसले, तृप्ती जगताप, अंजली जगताप, शिल्पा राऊत, रोहिणी कांबळे, सुनीता कांबळे, पल्लवी कांबळे, ज्योती आव्हाड, शामल पवार व इतर महिलांनी सहभाग घेतला होता.
Comments are closed