संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान- ३ मोहीमतेतील ‘विक्रम लँडर’ने आज यशस्वी अवतरण केले. अंतराळ संशोधनातील हा ऐतिहासिक क्षण आहे. भारतीयांसाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी भारतीय अंतराळ संस्था ISRO चे वैज्ञानिकांनी मेहनत घेताना, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा पराक्रम करून दाखविला. अशी कामगिरी करणारा जगात भारत चौथा देश ठरला आहे.
चांद्रयान-३ मोहिमेमुळे भविष्यातील संशोधनास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत आंतराळ क्षेत्रात बलशाली कामगिरी करीत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले, हा अनुभव अविस्मरणीय आहे.
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.Congratulations, India🇮🇳!#Chandrayaan_3#Ch3
— ISRO (@isro) August 23, 2023
Comments are closed