भगतसिंह कोश्यारी यांनी ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आपल्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही वेळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच, अजित पवार आहेत. त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात,” असे कोश्यारी यांनी म्हटले.

 

” संघटनेत अजित पवारांची मोठी ताकद “

“मला कधीकधी अजित पवारांची दया येते. ते अतिशय हुशार आहेत. अजित पवारांकडे चांगला जनाधार आहे. संघटनेत त्यांची ताकद आहे. त्यामुळे अनेक आमदार आणि खासदार त्यांच्याबरोबर असतात. प्रत्येकांचे एक व्यक्तिमत्व असते,” असेही भगतसिंग कोश्यारी म्हणाले.

 

अजित पवारांसंबंधी भगतसिंग कोशियारी म्हणाले ते तर………..

 

महाविकास आघाडीचे सरकार असताना सातत्यपूर्ण वादग्रस्त वक्तव्य आणि निर्णयांमुळे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द कायमच वादळी ठरली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे भगतसिंह कोश्यारी प्रचंड चर्चेत आले होते.

आता भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. मात्र या कौतुकावरही टीकाच होण्याची शक्यता आहे.

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!