पिंपरी, दि.२७:- जीवन दुसऱ्या करता जगता आले नाही तर ते जीवन नाही हेच बिद्र मानून मदर तेरेसा यांनी आपले आयुष्य गोरगरीब असहाय व पिडीतांच्या सेवेसाठी समर्पित केले अनाथांना आधार देणाऱ्या मानवतावादी नोबेल पारितोषिक व भारत रत्न हे सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाले होते.
गोरगरीब दिन दलितांची व कुष्ठरोग्यांची सेवा करणारे संत मदर तेरेसा यांची जयंती दापोडीमध्ये मोठ्याा प्रमाणात साजरी,होली क्रॉस चर्चमध्ये फादर अल्बर्ट फर्नांडिस,ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे,बाजीराव दळवी,नितीन गोरडे,रंजित गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते मेणबत्ती लावून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी सामाजिक कार्याबद्दल संत मदर तेरेसा सेवा गौरव पुरस्कार लता मोरे, मरलीन जोसेफ,बेला मॅनवेल,विक्टोरिया जेवियर,रेखा बारके यांना देण्यात आला तर आब्रोस तडकरन,बेस्टीन सबस्टिन प्रफुल उतखेडे,रवि खोकर व इतर नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आज प्रत्येकाला गरज आहे संत मदर तेरेसा यांनी आपले जीवन गोरगरीब दिन दलितांच्या साठी पूर्ण जीवन त्यांच्या सेवा करण्यासाठी अर्पण केले,तसेच आपण सुद्धा थोडं काय होईना मदर तेरेसा यांच्या सारखी सेवा करावी आज खरोखरच भारतामध्ये खूप असे गोरगरीब गरजू आहेत त्यांना आपली गरज आहे त्यासाठी आपण थोडे काम करावे आणि जे असे काम करतात त्यांचा आपण मान सन्मान करून त्यांच्या कडून प्रेरणा घ्यावी असे मनोगत ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिओन लावाज तर आभार प्रदर्शन परसियस राजन यांनी मानले.
Comments are closed