आकुर्डी,दि.११ :- आकुर्डी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिशुविहार प्राथमिक विद्यालययात ७ सप्टेंबर रोजी संस्था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
यावेळी, वर्धापन दिनाचे औचित्य साधून इयत्ता ३ रीचे वर्गशिक्षक प्रकाश कदम यांनी विद्यार्थ्यांना संस्थेविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली व संस्थेचे संस्थापक कै. बाबुरावजी घोलप यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
“इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी” या उक्तीप्रमाणे संस्थेचा वाढलेला शाखा विस्तार व विद्यार्थ्यांची वाढलेली गुणवत्ता वाढ याविषयी सखोल माहिती सांगितली.
इयत्ता ३री व ४ थी च्या काही निवडक विद्यार्थी बाबुरावजी घोलप यांच्या वेशभूषेत हजर होते.
इ . ४थी मधील काही विद्यार्थ्यांनी संस्थेविषयीचे आपले मत थोडक्यात व्यक्त केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता काळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विकास गायकवाड यांनी केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
Comments are closed