सांगवी, दि.१३:- पुणे जिल्हा रुग्णालय मध्ये आयुष्यमान भव या प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत प्रत्येक कुंटुंब ला पाच लक्ष पर्यत लाभ देण्याचे या आयुष्मान कार्ड मध्ये योजिले आहे.
पुणे जिल्हा रुग्णालय मध्ये या आयुष्यमान कार्ड चे लाभार्थी ना वाटप करण्या करिता केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने ऑन लाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी स्थानिक आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी त्यांनी सदर आयुष्यमान कार्ड चे लाभार्थी ना वितरण करणे , त्याची जन जागृती करणे व गोरगरीब जनतेला या कार्डचा लाभ कसा घेता येईल याची माहिती दिली.
यावेळी पुणे जिल्हा रुग्णालय चे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागनाथ यंप्पाले पुणे विभागाचे उपसंचालक डॉ राधा किशन पवार यांचे सह पुणे जिल्हा परिषद चे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र हांका रे यांचेसह अनेक वैद्यकीय अधिकारी ,नर्सेस, तसेच प्रशासकीय अधिकारी व अधीसेविका श्रीमती विजयमाला बेले व प्रशासकीय कार्यालयातील प्रकाश आगवणे, किरण पुराणिक, अजय झुंझार राव व मान्यवर हजर होते.
Comments are closed