पिंपरी, दि.१५ :- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, शिशुविहार प्राथमिक विद्यालय,आकुर्डी,पुणे-४४ या विद्यालयात या वर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त पालकांसाठी एक आगळा- वेगळा उपक्रम घेण्यात आला.यावर्षी पालकांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी गणपती बाप्पाची सुंदर व आकर्षक रांगोळी साकारणे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यासाठी फ्लेवर्ग , शिशुवर्ग,बालवर्गाच्या पालकांना तशी सूचना देऊन त्यांना तयारी करण्यास सूचित करण्यात आले.
सर्व प्रथम सरस्वतीमातेच्या मूर्तीची पूजा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका योगिता काळे व उपस्थित पालकांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापिका काळे यांनी उपस्थित सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या, सर्व पालकांना स्पर्धेचे नियम सांगितले व आवश्यक ते सहकार्य केले.
सर्वच पालकांनी स्वतःच्या कल्पनेने एकदम सुंदर व आकर्षक अशी रांगोळी काढली. त्यामध्ये खूप विविधता दिसून आली.परीक्षक म्हणून सारिका मोकाटे व मनीषा मोरे यांनी काम पाहीले.
सर्वच पालकांना उपक्रमात सहभागी होऊन आनंद मिळला, अशा प्रतिक्रिया दिल्या.
अशा प्रकारे हा वर्गशिक्षिका माधवी भोसले, गौरी वाडकर, मंजूषा बावधनकर, बालिका कुलकर्णी, सिमा सोनवणे यांच्या सहकार्याने व शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता काळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम उत्साहात व आनंदात पार पडला.
Comments are closed