सासवड, दि.२३:-  येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवानिमित्त सासवड च्या अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे जाऊन अथर्वशीर्ष पठण केले.

शाळेने, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष, तसेच शाला समितीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे , संस्थेचे सहसचिव, शाला समितीचे महामात्र सुधीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या उपक्रमासाठी भारतीय भाषांचा अभ्यास या विषयांर्गत संस्कृत विषयाची निवड केली आहे.

त्यातील अथर्वशीर्ष पठण हा पहिला उपक्रम शाळेने राबविला. यात, शाळेतील इ. ३ री, ४ थी चे ३०० विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी आठ अष्टविनायक गणपतींसाठी आठ वेळा अथर्वशीर्ष पठण केले. यानंतर, गणपतीची सामुदायिक आरती झाली. यावेळी मंडळाचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
गणपती मंडळाकडून मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. गणपती मंडळाने विद्यार्थ्यांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती.
यावेळी, शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पवार, मंडळाचे कार्यकर्ते, परिसरातील नागरिक यांनी या उपक्रमाचे तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी, शिक्षक मंजुषा चोरामले, आशा ढगे, माणिक शेंडकर, नरेंद्र महाजन, दीपक कांदळकर, शारदा यादव, शीतल चौधरी,  मीना खोमणे इ. उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!