पुणे,दि.२३ :- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, युथ रेड क्रॉस युनिट व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या वतीने आणि पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने एस. एम.जोशी पूल मुठा नदीपात्र येथील कृत्रिम विसर्जन हौद येथे गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात पर्यावरण संरक्षण पार्श्वभूमीवर राबविलेल्या मूर्ती संकलन, हौदातील गणेश विसर्जन उपक्रमाचे नागरिकांडून मोठ्याप्रमाणात स्वागत झाले आहे. या संकल्पनेबाबत संकलन केंद्रावर ठेवलेल्या अभिप्राय वहीतून नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करीत कौतुक केले आहे. त्यामुळे पारंपारिकतेला फाटा देत नव्या सुधारणावादी विचाराने पुढे जाण्याची सामाजिक मानसिकता निमित्ताने दिसून आली आहे.निर्माल्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट आता लावली जात असल्याने नदी पात्र यामध्ये हे निर्माल्य जावून संबंधित जलस्त्रोत प्रदुषित होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे पुणे महानगरपालिका वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गणेश किरीड,आरोग्य निरीक्षक राजेंद्र वैराट यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. श्रीनिवास इपलपल्ली, डॉ. अशोक शेळके,डॉ. शोभा तितर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. आदिनाथ पाठक,डॉ. प्रकाश हुंबाड, प्रा. गौरी मारणे, प्रा. प्रियांका जाधव,वरिष्ठ लिपिक विनोद रणपिसे करत आहेत.
Comments are closed