शिबिरामध्ये प्रामुख्याने डायबिटीस, नेत्र तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी करण्यात आली. तसेच आभा कार्ड नोंदणी व कार्ड वाटप करण्यात आले.

देहू,दि.२३:-  लायन्स क्लब ऑफ पुणे श्री क्षेत्र देहू व प्राथमिक आरोग्य केंद्र देहू यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रसरकारच्या आयुष्यमान भव या योजनेअंतर्गत शनिवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिर श्री संत शिरोमणी सावतामहाराज मंदिर माळीनगर देहूगाव येथे आयोजित करण्यात आले होते.

शिबिरामध्ये प्रामुख्याने डायबिटीस, नेत्र तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी करण्यात आली. तसेच आभा कार्ड नोंदणी व कार्ड वाटप करण्यात आले.

अवयवदान , नेत्रदान व रक्तदान यांविषयी जनजागृती करण्यात आली. नागरिकांची मुख्य आरोग्य अधिकारी लायन डॉ. किशोर यादव सर यांनी तपासणी केली. परिचारिका गारगोटे सिस्टर, महेंद्र बघेरिया एम के पॅथॉलॉजी लॅब, महा-ई-सेवा केंद्र देहूचे सतीश आवारी यांनी शिबिरामध्ये मोलाचे कार्य केले. या कार्यक्रमासाठी डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन लायन किरण पटेल , अध्यक्ष लायन प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष लायन संदीप परंडवाल, सचिव लायन डॉक्टर चंदनबाला दिघावकर, खजिनदार लायन किरण साळुंखे, नगरसेवक लायन योगेश परंडवाल ,लायन सतीश आवारी, लायन विलास पाटील, लायन नारायण ब्रह्मा, वृक्षदायी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संतोष हगवणे देहू भाजप शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल उपस्थित होते.

आरोग्य शिबिराची नियोजित वेळ सकाळी 7 ते १० पर्यंत होती परंतु नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे शिबिराची वेळ 1.30 वाजेपर्यंत वाढवण्यात आली. आजच्या आरोग्य शिबिरामध्ये लायन संदीप परंडवाल यांनी अथक परिश्रम घेतले.

 


 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!