पिंपरी, दि.२४ :-  कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती निमित्त अरुण पवार संस्थापक अध्यक्ष मराठवाडा जन विकास संघ व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 


यावेळी जातिभेदाची पोकळी नष्ट करून सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे, शिक्षणासोबतच स्वावलंबनाचे बाळकडू देऊन युवा वर्गामध्ये स्वाभिमान व आत्मविश्वास निर्माण करणारे, आशिया खंडातील सर्वात मोठ्या आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी, शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाड्यातील गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत पोहचवणारे आधुनिक भगिरथ, दीन-दलित बहुजनांना ज्ञानामृत पाजणारे ज्ञानमहर्षी, स्वतःच्या प्रत्यक्ष कृतीतून समाजप्रबोधन घडवून आणणारे कृतिशील समाजसेवक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक “कर्मवीर भाऊराव पाटील” यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन करण्यात आले.

रयत शिक्षण संस्थेच्या,
श्री सिद्धेश्वर विद्यालयाला मु. वेताळे तालुका खेड (पुणे) यांना पद्मविभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त
वृक्षमित्र अरुण पवार यांनी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना झाडे लावा- झाडे जगवा,  देश वाचवा, देशी झाडे व फळांची झाडे 100  शंभर वृक्ष भेट देऊन मनुष्य जीवसृष्टी वाचवा – प्राणी मात्रा वाचवा असा संदेश देण्यात आला.


देहूत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या वतीने गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन

लालबागच्या राजाचं दर्शन आता घ्या थेट घरातून.

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!