औंध,दि.२७ :- औंध येथील श्री शिवाजी विद्यामंदिरातील आठवी ब मध्ये शिक्षण घेत असलेला आरुष राम चव्हाण याने राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच कांस्य पदक मिळविले.
आरुषने मागील आठवड्यामध्ये निमगाव केतकी ता. इंदापूर येथे विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. यानंतर त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. दोन दिवसांपूर्वी उदगीर. जि. लातूर या ठिकाणी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून कांस्य पदक मिळविले. आरुषची घरची परिस्थिती बेताची असूनही सध्या आरुष औंध येथील तालमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्याला पै. विकास रानवडे, विराज रानवडे तसेच तुषार सोमवंशी प्रशिक्षण देत आहेत. यासाठी प्रशालेच्या प्राचार्या भारती पवार यांनी आरुशला कांस्य पदक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य सुबोध गुरव, पर्यवेक्षिका मनिषा चंदनशिवे, संस्थेचे कार्याध्यक्ष वाय.जी. कांबळे, आरुषची वडील राम चव्हाण, आई सुषमा, चुलते श्याम चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी क्रीडा शिक्षक बलभीम भोसले, सुधाकर कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिपीन बनकर यांनी केले.
जनता शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष पोपटराव देवकर यांच्या हस्ते आरुषला गौरविण्यात आले. यावेळी कास्यपदक, प्रमाणपत्र व शिक्षणासाठी रोख पारितोषिक देण्यात आले. उपाध्यक्ष धनाजी वाबळे, हेमंत बगनर, रामेश्वर होनखांबे, रामदास खाटमोडे, पतसंस्थेचे सभापती विद्या धुमाळ, सचिव बब्रुवाहन घोडके, शंकर बोराटे आदी उपस्थित होते.
तसेच संस्थेच्या दादामाई ग्रुप मंचच्या वतीने सुध्दा आरुषचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमाणपत्र, रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आरुषचा यापुढील बारावीच्या शिक्षणापर्यंत सर्व आर्थिक खर्च मंचच्या वतीने करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले यावेळी प्रा. सुभाष जावळे, बाळासाहेब माशेरे, राजेंद्र खरमाटे, विजय बागडे, बालासाहेब गायकवाड, रोहिदास बेळगे, अनिल जायभाय, अशोक गोसावी, सुधीर बहिरट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश आगम यांनी केले.
पुढील स्पर्धा मी जिंकणारच
आज पर्यंत मी विविध स्पर्धा खेळत आलो. मात्र याचवेळी राज्यस्तरीय स्पर्धेत खेळलो. मला या स्पर्धेचा अनुभव नव्हता. मात्र आता राज्यस्तरीय स्पर्धेचा अनुभव आल्यामुळे मी या पुढील होणाऱ्या विविध स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला आहे.
– आरुष चव्हाण, पैलवान.
आरुष कष्टाळू भावी पैलवान
प्रतिकूल परिस्थितीत मेहनत करून मेहनत करणारा मला भावी पैलवान वाटतो. या स्पर्धेत राज्यस्तरीय कांस्यपदक जिंकले आहे. पुढील वर्षीच्या स्पर्धेत तो आपल्या महाराष्ट्राचे नाव देश पातळीवर नेईल, याची मला खात्री वाटते.
– भारती पवार, प्राचार्या औंध प्रशाला.
Comments are closed