पिंपरी, प्रतिनिधी : खडकी रेंजहिल्स येथील राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ यंदा पस्तीसावे वर्ष साजरे करीत असून, आकर्षक गणेशमूर्ती आणि रोषणाई गणेश भक्तांना आकर्षित करीत आहे. मंडळ साधेपणाला प्राधान्य देत आलेले आहे. मंडळाच्या गणरायाची आरती छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.
राष्ट्रीय मित्र मंडळ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविते. यंदा मंडळाने आकर्षक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ओंकार राजू आसवले हे अध्यक्ष आणि अंजिक्य शेलार हे उपाध्यक्ष आहेत.
आकर्षक विद्युत रोषणाईने तेजोमय प्रकाशात गणपती मूर्ती उजळून निघालेली आहे. आकर्षक श्रीगणेशाची मूर्ती हेही मंडळाचे वेगळेपण आहे. या ठिकाणी भक्तिमय वातावरण दिसून येत आहे.
विविध परिसरातून बालचमू, नागरिक दर्शनासाठी येत असतात. मंडळाची दरवर्षी विसर्जन मिरवणूकही डोळ्याचे पारणे फेडणारी असते. मंडळाने कोरोना काळात गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, पूरग्रस्तांना मदत आदी विविध उपक्रम राबविले आहेत.
आरुषने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पटकाविले कांस्य पदक
देहूत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद
लालबागच्या राजाचं दर्शन आता घ्या थेट घरातून.
Comments are closed