पिंपरी, प्रतिनिधी :
खडकी रेंजहिल्स येथील नावाजलेल्या एटीएस मित्र मंडळाने इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला.
सुरुवातीपासून मंडळ सामाजिक कार्यासाठी प्रसिध्द आहे. मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. कोरोनामुळे उद्भवलेल्या कठीण काळातही मंडळातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले होते.
यंदा मंडळाने पर्यावरण वाचवा संदेश देत इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला आहे. यामुळे नागरिकांमधून मंडळाचे कौतुक होत आहे. मंडळाच्या गणरायाची आरती छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते सुजीत म्हस्के, सुनीत कदम, कार्तिक पालकर, अक्षय सरोदे, साहिल धर्मलिंगम, दिनेश धर्मलिंगम आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!