पुणे दि२९( punetoday9news):-  शासनाने खरीप हंगाम २०२० मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम २०२० करिता ३१ जुलै २०२० अशी आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीच्या पुर्वी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतक-ऱ्यांना सहभागी होता येणार नाही. योजनेत सहभागी होण्याची अंतीम मुदत वाढविणे केंद्र शासनाच्या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अशक्य असल्याने अशा स्वरुपाच्या कोणत्याही चर्चेवर विश्वास न ठेवता नोंदणीसाठी नजीकच्या बँक अथवा आपले सरकार केंद्रामध्ये ३१ जुलै २०२० पर्यत विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
राज्यातील वनहक्क जमिनधारक शेतक-यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सविस्तर सुचना कृषि विभागामार्फत जिल्हास्तरावर व संबंधित विमा कंपनींना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन राज्याच्या कृषि आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed

error: Content is protected !!