पिंपरी, दि.१ :- भारतीय जैन संघटना संचालित प्राथमिक विद्यालय, संत तुकाराम नगर पिंपरी येथील सहाय्यक शिक्षिका अरुणा मधुकर धिवार यांनी आपल्या सेवेची पंचवीस वर्षे पूर्ण केल्या बद्दल त्यांच्या सेवेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
सरस्वती पूजन आणि दिप प्रज्वलित करून व इयत्ता चौथीच्या मुलींनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरूवात झाली
संस्थेचे प्रकल्प अधिकारी सुरेश साळुंखे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले याप्रसंगी प्राचार्य संतोष भंडारी, प्राचार्य दिलीपकुमार देशमुख, पर्यवेक्षक पांडुरंग पवार, उपप्राचार्य राजेंद्र कोकणे व मुख्याध्यापक संजय जाधव उपस्थित होते.या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले हे प्रदर्शन सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरेल असे त्यांनी गौरव उद्गार काढले.या प्रदर्शनातील सर्व साहित्य धिवार मॅडम यांचेकडून शाळेला भेट देण्यात आले. मातोश्री भामाबाई डावरे यांच्या हस्ते शाळेस देणगी देण्यात आली . याप्रसंगी अरुणा मधुकर धिवार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. अनेक शाळांतील विद्यार्थी, शिक्षकांनी या प्रदर्शनास भेट दिली. धिवार यांचे सर्व कुटुंबीय या कार्यक्रमास उपस्थित होते. या वेळी संपत गर्जे सरांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामूळे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा.दिलीप सुर्वे, प्रा.मुकुंद सावळकर, प्रा.हनुमंत डावरे, शैला बर्वे, कविता वाघमारे, विजया बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप बोरसे, स्नेहलता वाडेकर, अपर्णा कुमठेकर, सायली माने, सुवर्णा जाधव, सविता अमोलिक, भाग्यश्री भोईर, प्रणाली खंडागळे या सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी मदत केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास गुंजाळ यांनी तर सूत्रसंचालन स्वाती डावरे यांनी केले सर्वांचे आभार दीपिका सावंत यांनी मानले.
Comments are closed