पिंपरी : प्रतिनिधी

विद्यार्थी जीवनात झालेले सत्कार,मिळालेले पुरस्कार पुढील आयुष्यासाठी स्फुर्ती देणारे ठरत असतात असे मत पुणे येथील आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले.

अहिल्यादेवी सेवा संघ, सांगवी यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव येथील निळूभाऊ फुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या
या कार्यक्रमास माजी कॅबिनेट मंत्री राम शिंदे , आमदार अश्विनी जगताप,भाजपा शहराध्यक्ष शंकर आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, राष्ट्रीय सुगी पाश्चात्य संस्थेचे उपसंचालक डॉ. सुभाष घुले, ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, राजेंद्र राजापुरे,
माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, माजी स्वीकृत सदस्य महेश जगताप, राजू दुर्गे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, आशा शेंडगे, उषा मुंडे, सुर्यकांत गोफणे, दिलीप तनपुरे, संजय जगताप, बंडू मारकड, मुकुंद कुचेकर, मोहन पाटील, विनायक पिंगळे, बाबासाहेब चितळकर, महावीर काळे, संजय नाईकवडे, सागर फुगे, मधुकर लंभाते, विजयकुमार हरणावळ, राहुल जवळकर, अरुण पवार,अभिमन्यू गाडेकर, अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष अजय दुधभाते यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे,आमदार अश्विनी जगताप ,शंकर जगताप आदींनी आपल्या मनोगतातुन संघाच्या कार्याचे कौतुक केले.तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सूर्यकांत गोफणे यांनी प्रास्ताविक केले.
नामदेव तळपे व शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दिनेश गाडेकर यांनी आभार मानले.

 

अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी :आमदार अश्विनी जगताप

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा ,विचारांचा आदर्श डोळ्यासमोर सांगवी येथील अहिल्यादेवी सेवा संघ काम करत आहे.

समाजबांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केली.

 

 

 

कर संकलन विभागाचा ‘मास्टरस्ट्रोक’; सहा महिन्यांत 60 टक्के मालमत्तांचा कर वसूल

 

अरविंद एज्युकेशन सोसायटीत महात्मा गांधी जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी केली ‘थुंकी मुक्त अभियाना’ची जनजागृती

 

पासवर्ड विसरलात? चिंता नको पासवर्ड शोधण्याची सोपी ट्रिक.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!