आकुर्डी,दि.४:-   पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार प्राथमिक विद्यालय आकुर्डी ४४ या विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली.

शाळेच्या मुख्याध्यापिका काळे योगिता यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सरस्वती पूजन बोरकर प्रिया, दिपाली मोहिते यांच्या हस्ते झाले.

नंदकिशोर ढोले यांनी महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोनिका चव्हाण यांनी केले. यावेळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले यात शालेय तसेच शाळेच्या परिसरातील भाग इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. यावेळी इयत्ता तिसरी इयत्ता चौथीचे विद्यार्थी मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. इयत्ता तिसरी चे वर्गशिक्षक प्रकाश कदम, वनिता गायकवाड, सुलभा दरेकर व इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक दिपाली मोहिते, नंदकिशोर ढोले, मोनिका चव्हाण यांचाही सहभाग होता. विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी आवड व स्वच्छतेचे महत्व समजावे याविषयी मुख्याध्यापिका योगिता काळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!