पुणे, दि.७ :- पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथेश्री मेंगाई देवी मंदिराच्या परिसरात आय.एल.एस विधी महाविद्यालयाच्या वतीने कायदेशीर साक्षरतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लीगल ऐड कॅम्प अर्थात मोफत कायदा सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास वेल्हे येथील तहसीलदार दिनेश परागे साहेब आणि वेल्हे गावचे गावचे सरपंच मेघराज सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाविद्यालयाचे प्रा. ज्ञानेश्वर केंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १९२४ मध्ये स्थापन झालेले आय एल. एस. विधी महाविद्यालयाने गेल्या ९९ वर्षांमध्ये केवळ विधी क्षेत्रातच नव्हे तर देशाच्या राजकीय , सामाजिक , सांस्कृतिक जडघडणीत अनन्यसाधारण योगदान दिलेले आहे.
आय.एल.एस विधी महाविद्यालयाच्या मोफत कायदा सल्ला केंद्राच्या मार्फत समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये कायदेशीर साक्षरतेचा प्रचार करुन जनजागृती करण्याचे काम केले जाते. या शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी घरगुती- कौटुंबिक हिंसाचार मीडियशन किंवा मध्यस्थता ,जमिनीविषयी असणारे कायदेशीर प्रश्न आणि उपाययोजना या विषयांवर पथनाट्य सादर करण्यात आली.
त्याचबरोबर विधी विद्यार्थ्यांनी माहितीचा अधिकार, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या कायदेशीर तरतुदी, विविध सेवाभावी संस्था, घरगुती हिंसाचार कायदा, महिला शशक्तिकरण आणि बचतगट, मृत्यपत्र आणि कायदेशीर तरतुदी,ग्राहक संरक्षण कायदा, लोक-अदालत, माहिती आणि तंत्रज्ञानाचा कायदा, ७/१२ उतारा आणि कायदा
या सारख्या अनेक महत्त्वाच्या कायद्यांवर आपल्या भाषणांद्वारे गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या शिबाराचे विद्यार्थी समन्वयक म्हणून प्रशिक राक्षे , शंतनू गायकवाड, प्रतीक जानकर, संकेत मदने आणि प्रसाद लंगोटे यांनी काम पाहिले.
Comments are closed