पुणे,दि.१५ :-  हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा स्व. प्रा. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार यंदा मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र व उद्योजक अरुण पवार यांना, तर स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. धनंजय भिसे यांना जाहीर झाला आहे.

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने विजयादशमी आणि हिंदू शौर्य दिनानिमित्त येत्या 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल असणार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता ऍड. अश्विनीकुमार उपाध्याय मेळाव्याला संबोधित करतील. कार्यक्रमाला हिंदू बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

स्व. प्रा. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कारार्थी अरुण पवार यांनी आजपर्यंत 25 हजाराहून अधिक वृक्षांची लागवड करीत त्यांची जोपासना केली आहे. देहू, आळंदी, तुळजापूर, उस्मानाबाद, भगवानबाबा गड (घाट सावरगाव) अशा अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे. विशेष म्हणजे फक्त दिखावा किंवा प्रसिद्धीसाठी वृक्ष लागवड केलेली नसून, यातील सर्वांच्या सर्व रोपांचे वृक्षात रूपांतर झाले आहे. सहा फुटांतून अधिक उंचीची रोपे लावून पुढील तीन चार वर्षे या वृक्षांना टँकरद्वारे पाणी देऊन ही रोपे जतन केली जात आहेत. उन्हाळ्यातही झाडे वाचली पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे. एकप्रकारे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या माध्यमातून ते पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य करीत आहेत. या कार्याची दखल घेऊन अरुण पवार यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.


 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!