सांगवी,दि.१८ :-   सांगवी फाटा येथील पुणे जिल्हा रुग्णालय मधील राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र मध्ये पहिल्या राष्ट्रीय क्षयरोग प्रशिक्षकांची प्रशिक्षण वर्ग चा शुभारंभ राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले सदया परिस्थितीत पुणे आरोग्य विभाग मध्ये पुणे विभागाचे उपसंचालक डॉ राधा किशन पवार आणि डी अनिरुद्ध देशपांडे यांचे आरोग्य विषयी कार्य उल्लेखनीय आहे यावेळी त्यांनी क्षयरोग प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले आणि राज्यामध्ये जास्तीत जास्त प्रशिक्षक तयार करण्याचा संकल्प केला.
यावेळी देशात पाच क्षयरोग नियंत्रण केंद्र असून त्यात पुणे येथील केंद्राचा समावेश असल्याचे सांगितले.राज्य क्षयरोग नियंत्रण केंद्र चे प्रशिक्षक डॉ प्रकाश जाविर हे विशेषतः प्रशिक्षण वर्गाला प्रशिक्षण देणार आहेत.

यावेळी कार्यक्रमाला केंद्र शासनाने चे अतिरिक्त उपसंचालक डॉ संजयकुमार ,राज्याचे सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाहित, पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधा किशन पवार,पुणे जिल्हा रुग्णालय चे डॉ. नागनाथ यामापल्ले,प्राचार्य डॉ. संदीप सांगळे, डॉ. अनिरुद्ध देशपांडे,डॉ अभिजीत होस्मनी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी राजेश राऊत, मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल बांगर तसेच प्रशासकीय अधिकारी दत्ता शृंगार व नरेंद्र वळे उपस्थित होते.


 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!