पिंपरी,दि.२१ :- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार प्राथमिक विद्यालय आकुर्डी पुणे 44 या विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज कब पथक आणि कल्पना चावला बुलबुल पथकाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या अंगी बालपणापासून निसर्गप्रेम, प्राणी -पक्षी यांच्या बद्दल प्रेम ,तसेच सामाजिक मूल्यांची रुजवणूक होण्यासाठी सदर उपक्रम विद्यालयात राबविण्यात आला. या उपक्रमासाठी संत तुकाराम माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री कातोरे सर आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करत रहावे, निसर्गाबद्दल कृतज्ञ रहावे ,तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करावी असे सांगितले, पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहित करावे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीकडे लक्ष ठेवावे असे सांगितले .याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बडी सलामी, कब बुलबुलचे ध्येय ,नियम, वचन सादर केले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या विविध आरोळ्यांनी कार्यक्रमाचा उत्साह वाढविला .कार्यक्रमासाठी इयत्ता दुसरीचे सर्व पालक उपस्थित होते .
कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका काळे योगिता यांनी मार्गदर्शन केले. दिपाली मोहिते , सुलभा दरेकर या फ्लॉक लीडर, प्रिया बोरकर,
नंदकिशोर ढोले या कब लीडर आणि मंजुषा बावधनकर बनी लीडर यांनी सहकार्य केले.
Comments are closed