सासवड, दि.२१ :- नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेत आज भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील शिक्षिकांनी हत्तीच्या प्रतिकृतीचे पूजन केले. शिक्षिका माधुरी जगताप यांनी विद्यार्थ्यांना भोंडल्याची माहिती दिली. महिला शिक्षिकांनी भोंडल्याची गाणी म्हटली व विद्यार्थी, शिक्षिका, पालक यांनी दांडिया खेळण्याचा आनंद लुटला.
नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने घटस्थापनेपासून परिपाठाच्या वेळी देवीच्या विविध रूपांची माहिती महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. यात, मंजुषा चोरमले, आशा ढगे, शारदा यादव, शकुंतला आहेरकर, सुरेखा जगताप, शीतल चौधरी, अश्विनी कदम, मीना खोमणे, स्वाती बोरावके यांचा सहभाग होता.
शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. सर्वच विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले. या सर्व उपक्रमांचे शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांनी कौतुक केले.
Comments are closed