१८० रक्तदात्यांनी केले रक्तदान.
पुणे,दि.२३ :- नवरात्र उत्सवा निमित्त रामराज्य प्रतिष्ठान च्या वतीने पेरणे फाटा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रामराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक हेमंत माने, अध्यक्ष फिरोज शेख, नागेश मोकळे, डॉ प्रणव भिलारे, यांनी हा सामाजिक उपक्रम राबवून समाजाला एक चांगला संदेश दिला. १८० रक्तदात्यांनी रक्तदान केले, त्या सर्व रक्तदात्यांचे व रक्तदान शिबिर आयोजित करून चांगला उपक्रम राबवल्याबद्दल, हेमंत माने, फिरोज शेख, उपाध्यक्ष नागेश मोकळे, डॉ. प्रणव भिलारे यांचे संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी आभार मानले.
रक्तदान शिबिर झाल्या नंतर शिवव्याख्याते शेखर पाटील यांचे शिवव्यख्यान झाले, यावेळी रामराज्य प्रतिष्ठान चे पदाधिकारी, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed