सांगवी,दि.३० :- उरो रुग्णालय औंध छावणी येथील औंध हॉस्पिटल पंचायत वाल्मिकी मित्र मंडळा कडून व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे भगवान महर्षी वाल्मिकी यांची जयंती आनंद उत्साहात साजरी.

भगवान महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त रविवार २९ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे व राजाबाबू सरकनिया यांच्या कडून भगवान महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पुष्प हार घालण्यात आला व त्यानंतर संदीप दरेकर,सुनिल कोकाटे,प्रविण पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते भगवान महर्षी वाल्मिकी यांची आरती करण्यात आली आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे अध्यक्ष किशोर लालबेगी कार्याध्यक्ष सत्यवान ग्यानी उपाध्यक्ष राजेंद्र खेराले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले.

 

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून समाज मंदिरास भगवान महर्षी वाल्मिकी यांची सुंदर अशी प्रतिमा देण्यात आली.त्यानंतर आलेल्या सर्व भाविकांना महर्षी वाल्मिकी मंदिर कामगार वसाहत येथे महाप्रसाद देण्यात आला.

 

याप्रसंगी माजी महापौर माई ढोरे,माजी नगरसेवक अतुल शितोळे,रमेश चौधरी,रवि खोकर सतीश चंडालिया, हिरा वाघेला,राजु बेद,सागर चंडालिया,सुनिल चव्हाण,रोतास कजानिया,रामेश्वर सारसर,जगदीश कागडा,रोहित वाघेला,जयेश चव्हाण, जितेंद्र लखन,विशाल चटोले,जयेश वाघेला,नरेश सरकनिया,दिनेश घोरण,रविराजेंद्र सरकनिया,प्रकाश खत्री व इतर समाजातील बंधू भगिनी उपस्थित होते.


 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!