पिंपरी, दि.१ :-  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ,शिशुविहार प्राथमिक विद्यालय नेहमी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवते, त्याचबरोबर ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकी जोपासली जावे यासाठी देखील सामाजिक उपक्रम घेतले जातात.

त्या अंतर्गत संस्कार प्रतिष्ठान व शिशुविहार प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी बांधवांसाठी दिवाळीनिमित्त खाऊ, कपडे ,दैनंदिन वस्तू यांचे वितरण करण्याच्या दृष्टीने विद्यार्थी व पालक यांच्याकडून या वस्तू जमा करण्यात आल्या व प्रत्येक वर्गाचे वर्ग प्रतिनिधी व शिक्षक ,शाळेच्या मुख्याध्यापिका काळे यांच्या हस्ते संस्कार प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्याकडे या वस्तू देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकीची जपणूक या दृष्टीने सदर उपक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका काळे यांनी केले. या उपक्रमात विद्यालयातील‌ उपशिक्षक वर्षा नलावडे ,सुलभा दरेकर ,प्रिया वनारसे ,मोनिका चव्हाण ,वनिता गायकवाड ,ॲंजेलिना शिंदे,नंदकिशोर ढोले ,प्रकाश कदम ,विकास गायकवाड, मनोज मेदनकर यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आपले योगदान दिले.

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!