पिंपळे गुरव मध्येही एकच मिशन मराठा आरक्षण
पिंपळे गुरव , दि.१ :- संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पिंपळे गुरवतील सकल मराठा समाज यांच्या वतीने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पिंपळे गुरव येथे एक दिवसीय उपोषणला सुरुवात करण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंतरवालीत आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणाच्या पाठिंब्यासाठी पिंपळे गुरव येथील सर्व धर्मीय रहिवासी,ग्रामस्थ व मराठा बांधव एकवटले आहेत. यावेळी शंकर पांडुरंग जगताप,पिंपळे गुरव ग्रामस्थ हे ही या उपोषणाला बसल्याचे दिसून आले.
मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.या उपोषणाला पाठिंबा व मराठा आरक्षण तातडीने मिळावे यासाठी पिंपळे गुरव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आले आहे, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज, एक मराठा लाख मराठा, “एकच मिशन- मराठा आरक्षण” या घोषणा देण्यात आल्या.
पिंपळे गुरव परिसरातील सर्व समाजबांधव मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी एकत्र आल्याचे यावेळी पहायला मिळाले. मराठा बांधवा बरोबरच सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपोषणाला विविध संघटनानी पाठिंबा देत भेटी दिल्या.
Comments are closed