पुणे दि.२९( punetoday9news) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवार ३० जुलै रोजी पुणे येथे कोरोनाविषयक बैठका घेणार आहेत
गुरुवारी सकाळी ९ वाजता ते वाहनाने पुण्याकडे रवाना होतील. दुपारी १२.१५ वाजता पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांची कोरोना साथीसंदर्भात सर्व लोकप्रतिनिधीसमवेत बैठक होईल. त्यानंतर दुपारी २.३० वाजता त्यांची याच संदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणांसमवेत बैठक होईल
सायंकाळी ५ वाजता ते मुंबईकडे रवाना होतील
या बैठकांना त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार , मुख्य सचिव संजय कुमार तसेच इतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असतील.
Comments are closed