पुणे, ता.५: – पुणे महानगरपालिका आणि पुणे शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांनी ०५ नोव्हेंबर, २०२३ रोजी ई-कचरा व प्लॅस्टिकविषयी जनजागृती व संकलनाचे महाअभियान आयोजित करण्यात आले.

हे अभियान रविवारी, स ९ ते दु. १ वाजेपर्यंत, संपूर्ण पुणे शहरात ३०० ठिकाणी पार पडले.
पुणे महानगरपालिका, केपिआईटी टेक्नाँलॉजीस, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, जनवाणी, महालक्ष्मी इ- रिसायक्लर, के.के. नाग प्रा. लिमिटेड आणि इतर संस्थांनी या अभियाना मध्ये सक्रिय सहभाग घेतला.
या अभियानादरम्यान पुणे शहरातील सर्व भागात इ-कचरा संदर्भात जनजागृती करण्यात आली. वरील सर्व सामाजिक संस्थांनी पुण्यातील शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन या महासंकलनात सामील होण्याचे अहवान केले व या अहवानाला प्रतिसाद देत, १७ शैक्षणिक संस्थांकडून १००० हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग दिला. त्याचप्रमाणे पुणे महानगपालीकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी तसेच स्वच्छसर्वेक्षण २०२३ साठी नियुक्त केलेले ब्रॅंड ॲम्ब्यासीडर संगीतकार व कवी डॉ. सलील कुलकर्णी यांनी देखील पुणेकरांना या PEHEL२०२३ च्या महासंकलन अभियानात सामील होण्यासाठी आवाहन केले. या अभियानात पुणेकरांनी उत्सुर्त प्रतिसाद देत १५ टन ई-कचरा व ८ टन प्लॅस्टिक कचरा जमा केला. अभियाना दरम्यान ई-कचरा दान करणार्या प्रत्येक नागरिकास डोनेशन सर्टिफिकेट देखील देण्यात आले.
या अभियानाचे उद्घाटन शिवरकर उद्यान, वानवडी येथे पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त तसेच घन कचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांच्या हस्ते झाली, या उदघाटन सोहळ्यास कामिन्स इंडिया कंपनीच्या सी एस आर प्रमुख श्रीमती सौजन्या वेगुरू, केपीआयटी टेक्नोलोजीसचे मार्केटिंग विभागाचे संचालक श्री. धनंजय जाधव,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, कमिन्स कंपनीच्या अवंती कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
PEHEL२०२३ सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी उपायुक्त संदीप कदम यांनी सर्व पुणेकरांना आवाहन करत ओला-सुका कचरा आणि इलेक्ट्रोनिक कचरा घरातच वेगवेगळा करावा, जेणेकरून महानगरपालिकेला सर्व प्रकारच्या कचर्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे सोयीचे होईल. तसेच इलेक्ट्रोंनिक कचर्याच्या संकलनासाठी पुण्यातील पहिल्या टप्प्यात २३ गार्डनमध्ये संकलन केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. सौ. सौजन्या वेगुरू यांनी देखील स्वतःच्या घरातील ई-वेस्ट दान देऊन या उद्दात्त कार्यात सर्वांचा कृतीशील सहभाग असला पाहिजे असे सांगितले. जनवाणीचे उपसंचालक  मंगेश क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ई-वेस्ट कमी करण्यासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा दिला तसेच विविध सोसायटी मधून कायमस्वरूपी ई-कचरा संकलन बीन बसवणार असल्याचे देखील सांगितले. जनवानीचे सतीश आदमने यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

 


 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!