पिंपरी ,दि.७ :- आकुर्डी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिशुविहार प्राथमिक विद्यालयात दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापिका योगिता काळे व ज्येष्ठ शिक्षिका वर्षा नलवडे यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले. वर्गशिक्षिका माधवी भोसले, बालिका कुलकर्णी यांनी सणाची माहिती सांगितली. त्यानंतर चित्रकला स्पर्धेत प्ले वर्ग ते ४ थी पर्यंतच्या प्रत्येक वर्गातून प्रथम क्रमांक काढण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका योगिता काळे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. त्याचप्रमाणे स्पर्धा प्रमुख शिक्षकांना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. इयत्ता प्ले वर्ग शिशुवर्गाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले भेट कार्ड एकत्रित जमा करून सर्व शिक्षकांना मुख्याध्यापिका योगिता काळे यांनी दिवाळी भेटकार्ड देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुलभा दरेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन अँजेलिना शिंदे,सीमा सोनवणे, गौरी वाडकर, नंदकिशोर ढोले,मंजुषा बावधनकर यांनी केले. यावेळी दिपाली मोहिते प्रिया बोरकर,प्रकाश कदम विकास गायकवाड मोनिका चव्हाण वनिता गायकवाड हे शिक्षक उपस्थित होते
Advt:-
Comments are closed