पुणे,दि.7 :- राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा हडपसर (फुरसुंगी) ११ वा वर्धापन दिन व ग्राहक मेळावा आयोजित करण्‍यात आला, सदर प्रसंगी बँकेचे सभासद व खातेदार यांनी विविध क्षेत्रामधे केलेल्या उल्लेखनिय कामा बद्दल खातेदार, किरण पवार, संदिप राजाराम हरपळे, हडपसर डॉक्टर सेल चे प्रेसिडेंट डॉ.चंद्रकांत हरपळे,त्यांचे सहकारी डॉ.संजय आरु, डॉ, नितीन पाटील, डॉ,सुहास लांडे, यांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सदर प्रसंगी बँकेचे मुख्य व्यवस्थापक जितेंद्र साळुंखे, बँकेचे पुणे-मुंबई विभाग प्रमुख सुनिल राशिनकर यांनी बँकेचा एकुण व्यवसाय ३८०० कोटी असून डिसेंबर २०२३ अखेर ४००० कोटीचे उदिष्ट ठेवले आहे, सध्या बँकेच्या एकुण ४६ शाखा सेवेत असून नुकतेच बँकेस नव्याने आरबीआय ने दोन नवीन शाखा तासगांव ( सांगली ), कराड(सैदापूर) सुरू करणेसाठी परवानगी दिलेली आहे,तसेच बँकेची वाटचाल विद्यमान आमदार श्री. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली चालू असून नव्याने बँकेने ग्राहकांसाठी हॉटसअँप बँकिंग. २४x७ आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस सुविधा सुरू केलेली आहे, तसेच हडपसर (फुरसुंगी) शाखेच्या एकुण ठेवी ३० कोटी व कर्जे ३५ कोटी एकुण व्यवसाय ६५ कोटीच्या व नफा २ कोटी च्या वर आहे, सदर शाखा मागील वर्षी नवीन जागेत स्थालांतर नंतर शाखेच्या व्यावसायामध्ये वाढ झालेली आहे, बँकेने व्यावसायिक खातेदारांसाठी रु १००० मध्ये चालू ठेव खाते उघडणेबाबत योजना सुरू केलेली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळ्त आहे.उत्तम ग्राहक सेवा देणेसाठी बँक कटीबद्ध आहे, सदर प्रसंगी बँकेच्या खातेदार यांनी डिजिटल बँकिंग सुविधा वापरताना कोणती काळजी घ्यावी तसेच नामांकन सुविधा फ़ायदे,सिबिल बाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत ग्राहकांना मुख्य व्यवस्थापक जितेंद्र साळुंखे यांनी मार्गदर्शन केले,सदर प्रसंगी फुरसुंगी परिसरातील मान्यवर ग्राहक, अविनाश कोरे, सागर रुकारी, अनिल कामठे (सर) संजय हरपळे, प्रदिपशेठ खुटवड, राहुलशेठ तांबे, सचिन कुलकर्णी. आबासाहेब शेवाळे ,प्रगतशील शेतकरी दत्ताभाऊ कामठे उपस्थित होते,बँकेचे अधिकारी, विजय जवळगी, प्रदिप शिंदे, उत्तम पवार, माजी अधिकारी अविनाश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


 

 

 ? येथे तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी WhatsApp 8625867929

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!