पुणे, दि.१७ :-  आग्रा (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या ५२ वी केंद्रीय विद्यालय संघटन राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा – २०२३ मध्ये १४ वर्षाखालील मुले गटामध्ये मुंबई रिजन (महाराष्ट्र) तन्मेश अमोल सोनवणे याने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदकावर नाव कोरले.

तन्मेश हा प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे पुणे शहरांमध्ये अभिनंदनचा वर्षाव होत आहे. आणि तन्मेश हा त्याचे वडील व एन.एस.एन.आय.एस. बॉक्सिंग कोच अमोल सोनवणे यांचा मार्गदर्शनामध्ये बॉक्सिंग चे धडे गिरवत आहे व तन्मेश यांना रेल मजदूर युनियन पुणे डिव्हिजन अध्यक्ष संतोष कदम , रेल मजूर युनियन महासचिव महादेव कांबळे, ऑल इंडिया एसएसटी रेल्वे असोसिएशन संस्थापक अध्यक्ष पुणे डिव्हिजन आयुष्यमान भिमराव रणधीर. विशाल क्षीरसागर कार्याध्यक्ष पोलीस वेल्फेअर संघटना रेल मजदूर युनियन पुणे डिव्हिजनचे सल्लागार शिवप्रसाद डांगे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

 


 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!