पिंपरी,दि.२५ :- भारतीय संस्कृती दर्शनासाठी भारत भ्रमंतीवर आलेल्या,मॉरिशसवासीयांनी कासारवाडी येथील दत्तमंदिरात भजनसंध्या हा मराठी भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर केल्याने तेथील वातावरण आनंदी प्रसन्न व भक्तिमय झाले.
मॉरिशस मधील भजनालंकार या संस्थेचे 35 सदस्य,दिनांक 17 नोव्हेंबर पासून भारत भ्रमंती करत आहेत.दिल्लीपासून अनेक धार्मिक,सांस्कृतिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या.यादरम्यान कार्तिकी एकादशीनिमित्त त्यांनी कासारवाडी येथील दत्त मंदिरात मराठी भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर केला त्यामध्ये गायक अर्जुन पुतलाजी यांनी दत्तगुरूंचे नाम समरा,परब्रम्ह सच्चिदानंद,शिर्डीची वारी पहावी एक वेळ करून,आनंदू रे वृंदावनी आनंदू रे,चला पंढरीसी जाऊ.इतरचना सादर केल्या.त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
यावेळी वादनसाथ नारायण गोविंद,केशव रगजी,वंदना पुतलाजी यांनी केली.याचबरोबर खालापूरचे गायक विशाल रसाळ यांनीही काही भक्ती गीते सादर केली.त्याला प्रणित गरूमकर,वैभव रसाळ यांनी साथसंगत केली.याप्रसंगी भक्तीसंगीताच्या तालावर मॉरिशसवासीयांनी फेर धरला आणि उत्स्फूर्तपणे दिंडीनृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे निवेदन श्रीकांत चौगुले यांनी केले.दत्तमंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त शिवानंद स्वामी महाराज यांनी प्रास्ताविक केले.स्वागत सुभाषदादा काटे यांनी केले.याप्रसंगी विश्वस्थ विजय जगताप,अनिल बारणे,सुनील येडे पाटील,अप्पा बागल,उध्दव कवडे,संतोष लहाने,गणेश सोनवने,ललीत म्हसेकर,रमेश कशीद,संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे तसेच इतर मान्यवर व भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
Comments are closed