पुणे, दि. २७ : –  पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्या करिता” महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लि.” (पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट) यांच्या आस्थापनेत ” मे ओम साई सर्विसेस “या खाजगी एजन्सी मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त आहेत. तेथील ट्रॅफिक वॉर्डन गेले दोन वर्षापेक्षा जास्त दिवस कार्यरत आहेत. सदर एजन्सीकडून त्यांची पिळवणूक होत असल्याचे कामगारांनी सांगितले असून  याविरोधात कामगार उप आयुक्त पुणे व पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांच्याकडे तक्रार केली आहे.

कामगारांनी सांगितल्या प्रमाणे एजन्सी मालक त्यांना महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेले किमान वेतन ,प्रॉव्हिडंट फंड, कामगार विमा योजना, भरपगारी रजा, साप्ताहिक सुट्टी व इतर कोणतेही लाभ व फायदे देत नाही. तसेच त्यांच्या बँकेच्या खात्यातील रक्कम परस्परस कपात केली जाते परस्परच बँकेचे व्यवहार केले जातात. दोन वर्षे झाले त्यांना दिवाळी बोनस दिला नाही. नियमा बाहेर जाऊन जास्त वेळ म्हणजे बारा बारा तास जोर जबरदस्तीने त्यांना काम करावे लागते दरमहा पगार होण्याआधी शंभर रुपये इतके स्टॅम्प पेपर वर जोर जबरदस्तीने सह्या घेतात. एजन्सी चे सुपरवायझर पगार जमा झाल्यानंतर दरमहा पाच ते सात हजार रुपये कामगारांकडून वसूल करतात ह्या चालू वर्षातील दिवाळी बोनसची मागणी केली म्हणून आठ ते दहा कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले या संदर्भात कामगारांच्या वतीने एजन्सी विरोधात “भारतीय सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन” या संघटनेचे कार्याध्यक्ष श्री प्रशांत खंडाळे यांनी मा. अभय गिते ,कामगार उप आयुक्त पुणे व पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांच्याकडे तक्रार केली आहे.

तक्रारीत म्हणल्याप्रमाणे सदर एजन्सीने महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 च्या कलम 23 नुसार शासनाकडून कोणतेही सूट न घेता बेकायदेशीर शासनाची फसवणूक करत शासनाचा महसूल बुडवत नुकसान करत तेथील सर्व कामगारांची पिळवणूक करत बेकायदेशीर कोणतीही पूर्वसूचना न देता, आदेश न देता कामावरून काढले आहे. मे ओम साई सर्विसेस या खाजगी एजन्सीवर शासनाचा महसूल बुडवल्या प्रकरणी व कामगारांची पिळवणूक केल्या प्रकरणी एजन्सीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

 

 


रोजगार मेळाव्यात २६२ उमेदवारांची निवड

कासारवाडी दत्त मंदिरात मॉरिशसवासी भक्तांकडून विठ्ठल नामाचा गजर.

‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ.

 


 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!