सांगवी :- पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशन येथे सांगवी पोलीस स्टेशन शांतता कमिटी व सांगवी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून २६/११ हल्यातील शहीद पोलीस व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण भ्याड हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले आणि एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
या दहशतवादी भ्याड हल्ल्यावर जगाचे लक्ष केंद्रित झाले होते.
याप्रसंगी सांगवी पोलीस स्टेशन शांतता कमिटीचे संजय मराठे म्हणाली की दहशतवाद्यांच्याया भ्याड हल्ल्या विरोधात आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाने अत्यंत धडाडीने जीवाची परवा न करता आपले कर्तव्य बजविले त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचले. त्यांच्या या प्रेरणादायी कर्तव्य कामगिरीबद्दल दरवर्षी प्रमाणे सांगवी पोलीस स्टेशन शांतता कमिटी व सांगवी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून २६/११ शहीद झालेल्या पोलीस व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सांगवी पोलीस स्टेशन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल तांबे,पोलीस उप निरीक्षक कदम,पोलीस उप निरीक्षक नानाश्री वरुडे,अंमलदार सांगवी पोलीस स्टेशन शांतता कमिटीचे संजय मराठे,डॉक्टर देविदास शेलार,संदीप दरेकर,रमेश गाढवे,रमेश चौधरी,प्रफुल उतखडे आदी उपस्थित होते.
कासारवाडी दत्त मंदिरात मॉरिशसवासी भक्तांकडून विठ्ठल नामाचा गजर.
रोजगार मेळाव्यात २६२ उमेदवारांची निवड
Comments are closed