पुणे,३१ जुलै (punetoday9news ):- आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यातील राजीव गांधी प्राणीशास्त्र उद्यानात गुरुवारी ‘नंदिनी’ नावाच्या १६ वर्षीय वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला असल्याने प्राणीप्रेमींनी शोक व्यक्त केला आहे. पिवळा पट्टेरी बंगाली वाघ या प्रजातीतील ही वाघीण होती .
प्राणीसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले की, नंदीनिने मागील अनेक दिवसांपासून जेवण बंद केले होते. तिचे वय वाढल्यामुळे तसेच संधिवात व स्नायुदुखीमुळे तिचा मृत्यू झाला .
नंदिनीचा जन्म २००४ मध्ये पेशवा पार्क प्राणिसंग्रहालयात झाला होता. पेशवे पार्क मधून नवीन राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील सोळा वर्षांचा प्रवास तिने अनुभवला व संपूर्ण आयुष्य निरोगी जगले. गेल्या १५ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते.
Comments are closed