पिंपरी ,दि.29 :- क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले हे थोर समाजसुधारक, उत्तम लेखक,तत्त्वज्ञ आणि स्री शिक्षणाचे प्रणेते होते, त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य महान असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त उल्हास जगताप यांनी केले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामधील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

अभिवादन प्रसंगी माजी नगरसदस्य मारुती भापकर, कैलास कदम, मुख्य अभियंता रामदास तांबे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता अनघा पाठक, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपअभियंता सुनील दांगडे,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, नरेंद्र बनसोडे, तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!