पिंपरी, दि.५ :- पुणे जिल्ह्यातील जनता शिक्षण संस्थेची गव्हर्निंग कौन्सिल निवडणूक नुकतीच पार पडली.  यामध्ये दादामाई परिवर्तन पॅनेल ने सर्व जागांवर जिंकून येत १०-०  अशा मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला.

शिक्षकांची संस्था म्हणून नावलौकिक मिळवलेल्या संस्थेची ही निवडून खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.  दादामाई परिवर्तन पॅनेलने जयप्रकाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. सुभाष जावळे यांच्या नेतृत्वात लढली यात त्यांना कविता गोरे यांची खंबीर साथ लाभली.

जनता शिक्षण संस्था मागील कित्येक वर्षे संस्थापक अध्यक्ष जगताप कुटुंबातील व्यक्तिंकडे नव्हती , संस्थेसाठी जगताप कुटुंबियांनी खूप मोठा त्याग केला आहे. त्यांची संस्था परत त्यांच्या ताब्यात द्यायची हे शिक्षकांचे स्वप्न होते ते या निवडणूकीमुळे विजय मिळवून पुर्ण झाले असे मत नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी प्रा.सुभाष जावळे यांनी व्यक्त केले. 

तर नवनिर्वाचित खजिनदार कविता गोरे म्हणाल्या कि, हा सर्व शिक्षक मतदारांचा, सर्व शाखेतील माझ्या मतदार बंधु-भगिनींचा विजय आहे. स्व. किशोर गोरे यांचे जनता शिक्षण संस्थेचा विकास करण्याचा ध्यास मनात घेवून काम करायचे आहे.

 

नवनिर्वाचित सदस्य खालील प्रमाणे –

1)अध्यक्ष :  जगताप जयप्रकाश जयवंतराव

 

 

 

2) उपाध्यक्ष : कार्ले रमेश शंकर

 

 

 

3) कार्याध्यक्ष : आगम महेशकुमार सुरेश. 

 

 

 

 

4) खजिनदार : गोरे कविता किशोर         

 

 

 

 

5) जनरल सेक्रेटरी : प्रा. जावळे सुभाष बुवासाहेब

 

 

 

6) जॉईंट सेक्रेटरी : नवले रवींद्रनाथ शिवराम   

 

 

 

 

7)  असिस्टंट सेक्रेटरी :  खरमाटे राजेंद्र विठ्ठल

 

 

 

8) असिस्टंट सेक्रेटरी : नागवडे प्रदीपकुमार जालिंदर

 

 

 

 

9) ग्रामीण सदस्य : तांबे हेमंत जगन्नाथ

 

 

 

10) ग्रामीण सदस्य : पौळ बाळासाहेब श्रीरंग

 

 

 

 

 

 

 

 

 


 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!