पिंपरी, दि.१२ :-  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिशुविहार प्राथमिक विद्यालयात शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त मुख्याध्यापिका काळे योगिता यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.


त्यामध्ये विज्ञान प्रदर्शन, चित्रकला, रांगोळी, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे, रंगभरण या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

या स्पर्धांचे उदघाटन प्रामुख्याने संस्थेचे सहसचिव ए. एम.जाधव, पिंपरी चिंचवड महानगरपालिका-शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षिका सुगंधा मेमाणे, डॉ.तुलसी नारायण , पुण्यनगरीचे संपादक नंदकुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी पर्यवेक्षिका अनघा दिवाकर, माजी पर्यवेक्षिका जुन्नरकर, मुख्याध्यापिका योगिता काळे, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सभासद यांच्या हस्ते प्रथमतः रांगोळी, चित्रकला, हस्तकला या दालनाचे उदघाटन करण्यात आले.  इयत्ता पहिली ते तिसरीच्या मुलांनी बनवलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
पर्यवेक्षिका सुगंधा मेमाणे यांनी मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘शिशुविहार विद्यालय नेहमीच प्रत्येक उपक्रमात सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड शहरात शाळेचे नाव कमवत आहे,उच्च प्रतीची गुणवत्ता हीच शाळेची ओळख आहे” अशा शब्दात त्यांनी शाळेचे कौतुक केले.
विद्यालयातील विज्ञान प्रदर्शन दोन दिवस खुले राहणार आहे तरी परिसरातील जास्तीत जास्त पालक व नागरिकांनी उद्या प्रदर्शन पाहण्यास यावे असे आवाहन मुख्याध्यापिका काळे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक प्रकाश कदम यांनी केले. या स्तुत्य उपक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.


 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!