जेजुरी,दि.१३ :- आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालय मा. कृषिमंत्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
वकृत्व स्पर्धेत नीलम मस्के ( प्रथम )गौरव सणस (द्वितीय) सोनाली भोसले( तृतीय) यांना तर निबंध स्पर्धेत ज्योती स्वामी (प्रथम) रूपाली पवार (द्वितीय) काजल बनकर (तृतीय) या विजेत्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सिद्धी काळाणे व हर्षल पाटील यांना खेळात नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .
याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, सचिव शांताराम पोमण, बाळासाहेब मुळीक, भुजंगराव कोलते, प्राचार्य डॉ.बालाजी नाटकरे ,उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते उपस्थित होते .
याप्रसंगी शांताराम पोमण यांनी लंडनमधील वास्तव्याचे अनुभव कथन केले. त्यांनी भेट दिलेल्या विविध संग्रहालयाविषयी ,तिथल्या निसर्गाविषयी , लोकांच्या राहणीमानाविषयीची निरीक्षणे सांगितली .
विजय कोलते यांनी लेखन आणि वक्तृत्व यांसारख्या स्पर्धातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी मिळते. अशा स्पर्धातून मुलांचा बौद्धिक आणि भावनिक विकास होऊ शकतो. पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी केलेले कार्य हा देश आणि महाराष्ट्र कदापि विसरू शकणार नाही, अशी भावना याप्रसंगी व्यक्त केली. कृषी ,शिक्षण ,क्रीडा ,समाजकारण संरक्षण आणि महिला विषयी त्यांनी केलेली योगदान यामुळे आज समाजात विकास झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. बालाजी नाटकरे यांनी केले.परीक्षक म्हणून प्रा.डाॅ.अरुण कोळेकर प्रा.पोपट झोंबाडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. चंद्रशेखर काळे, प्रा.गौरी फडतरे ,प्रा. पूनम कुदळे, प्रा. पूजा तावरे , प्रा.मालुसरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. किशोरी ताकवले यांनी केले.
देहू : भंडारा डोंगरावर साकारतेय नागरशैलीतले महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर
Comments are closed