पिंपळेगुरव, दि.१५ :- नवी सांगवी कृष्णा चौक येथे शंकरभाऊ जगताप शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी यांच्या जनसंपर्क कार्यालया मध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रोज नागरिकांसाठी विविध योजनां सातत्याने राबविल्या जात असून याचा नागरिकांना मोठा फायदा होत आहे. तरी अजुनही विविध योजनेचा लाभ न घेतलेल्या नागरिकांना शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप भारतीय जनता पक्ष कार्यालयाच्या वतीने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यात मुख्यता नवीन मतदार नोंदणी करणे, नवीन मतदान स्मार्ट कार्ड देणे, नियमित रेशन घेणाऱ्या नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळून देणारी पंतप्रधान आयुष्मान भारत योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यांचाही समावेश आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत सुतार, लोहार, बोट बनविणे, लोखंड आणि इतर धातू पासून विविध वस्तू बनवणारे, मूर्तिकार, सोनार, कुंभार, चर्मकार, राजमेस्ती, बास्केट झाडू चटई बनवणारे, बाहुल्या आणि खेळणे बनवणारे, न्हावी, मालाकार, धोबी टेलर माशांची जाळी विणणारे असे अठरा पारंपारिक हस्तकारागिरी व्यवसायात असलेल्या कारागिरांसाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतून त्यांच्या व्यवसाया करता निधी मिळतो.
आशा योजनांचा फायदा अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा असे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्याकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
यावेळी नागरिकांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनाचे कार्ड आणि पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे प्रमाणपत्र वाटपही करण्यात आले .
यावेळी डॉक्टर देविदास शेलार सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे, शशिकांत नागणे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पिंपळे गुरव, सांगवी विभागाचे अध्यक्ष मदन तांदळे, शैलेश जाधव, महेश पांचाळ, ललित म्हसेकर, अंकुश लोखंडे, प्रकाश बेंबरे, अशिष शेळके, रोहित राऊत आदि मान्यवर व योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.
पुण्याच्या मनपा क्षेत्रातील विनापरवाना अनधिकृत बांधकामे रोखणार – मंत्री उदय सामंत
Comments are closed