पिंपरी, दि.१७ :- कासेगाव द न्यु एज्युकेशन सोसायटी संचलित, द न्यू एज स्कूल, पूणे जांबे येथील विद्यालया क्रीडा दिन मोठ्या उत्साहात शुक्रवार (दि.१५) रोजी संपन्न झाला.द न्यु एज स्कूल ही जांबे परिसरातील पहिली कॉन्सेप्ट स्कूल आहे
या कार्यक्रमासाठी शाळेचे मार्गदर्शक प्राध्यापक सुरेंद्र ग्रामोपाध्ये उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य जावेद पठाण यांनी त्यांचे स्वागत केले.
प्राध्यापक ग्रामोपाध्ये सरांनी शालेय जीवनात खेळाचे महत्व, सांघिक भावना याचे महत्व सांगितले, स्पर्धा करण्यापेक्षा सांघिक भावना निर्माण करण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर शाळेतील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभाग अशा दोन गटात उंच उडी, लिंबू चमचा, धावणे, लंगडी, पोते उडी, डाॅज बाॅल अशा पूर्व प्राथमिकच्या कौशल्याधारित खेळांचे आयोजन करण्यात आले. हा क्रीडा महोत्सव पाहण्यासाठी पालकांची मोठी उपस्थिती होती.
क्रिडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक प्रविण शेलार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments are closed