पिंपरी, दि.१८ :-   लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप कला आणि क्रीडा अकादमीतर्फे ‘LPJ इनोव्हेशन अवॉर्ड-२०२४ स्पर्धा’ आयोजित केली आहे. इयत्ता ७ ते ९, इयत्ता १० ते १२ आणि UG आणि PG अशा तीन श्रेणीमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळेल आणि वैयक्तिक व सांघिक अशी एकूण ७ लाख रुपयांची बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक आणि पालकांनाही त्यांच्या स्वप्नातील शहर साकारण्यासाठी कल्पना सूचवता येणार आहेत. विशेष म्हणजे, सर्वोत्तम ३२ कल्पनांना पुरस्कृत केले जाणार आहे.
शहरातील रहदारी, पायाभूत सुविधा, आपत्ती व जल व्यवस्थापन सांगणारी शाश्वत स्मार्ट सिटी, ई-गव्हर्नन्स, ॲप्स आणि प्लॅटफॉर्म सुविधांसाठी डिजिटलायझेशन, यांसह पर्यावरण, महसूल, आरोग्य आणि निरोगीपणा, संस्कृती आणि वारसा यावर तुमच्या नवसंकल्पनांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.


विद्यार्थी मित्रहो…चला तर मग,
आपण तयार केलेला प्रकल्प, पी.पी.टी., व्हिडीओ, अथवा संकल्पना www.lpjfoundation.com या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून त्यावर सबमिट करावी.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. (8956002507/ 8956002508) स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख दि. ३ जानेवारी २०२४.


 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!