पिंपळेगुरव, दि.१९ :-  पिंपळे गुरव येथे कोळी महादेव, ठाकर, गोंड, भिल्ल, कातकरी, कोकणा आदी जमातींच्या विवाहेच्छुक वधू वरांचा परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका उषा मुंढे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरूण पवार, सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष कृष्णा भालचिम, डी. बी. घोडे, उद्योजक किसनराव गभाले, गुलाब हिले, गोविंद पोटे, करवंदे गुरूजी आदी उपस्थित होते.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, आदिम विरांगणा राणी दुर्गावती, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे,  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी  दीपस्तंभ डॉ. गोविंद गारे यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.


महाराष्ट्रभर विखुरलेल्या आदिवासी बांधवांना वधू-वर परिचयाच्या निमित्ताने सर्व जमातींना एकत्र करून समाजोपयोगी उपक्रम राबविणे, ही चांगली गोष्ट आहे. म्हणुन समाजाच्या विविध जमातींना विविध अनुरूप स्थळांची माहिती वर्षभर करून देण्याचे परिश्रम घेतात, हे कौतुकास्पद आहे, अशा शब्दात अजित गव्हाणे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
मेळाव्याचे आयोजक आणि वधू वर केंद्राचे संस्थापक अध्यक्ष विष्णू शेळके यांच्या तर्फे आयोजित या मेळाव्याचे हे ९ वे वर्ष आणि हा १३ वा मेळावा होता. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थिरावलेल्या आदिवासी बांधवांची नाळ पुन्हा गावाशी जोडणे व जमातीत ऐक्य साधून आंतर जमातीय विवाहांना प्रोत्साहन देणे, हा यामागचा मूळ उद्देश होता.
मेळाव्यात विविध आदिवासी जमातींच्या ४०० हून अधिक वधू-वरानी नोंदणी केली
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रियंका घोटकर, विजय आढारी, रोहिणी शेळके, वैष्णवी कराळे, गौरी कराड, साईराज मुरगुंडी यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन देवराम चपटे यांनी, तर राणी आढारी यांनी आभार मानले.

 


 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!