दिल्ली, दि.१९ :- संसदेच्या सुरक्षेबाबतच्या हलगर्जीपणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावं, अशी मागणी करणाऱ्या खासदारांचं सलग दुसऱ्या दिवशी निलंबन करण्यात आले आहे.

आज (19 डिसेंबर) लोकसभेतील 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं असून, यात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशी थरूर, डिंपल यादव, कार्ती चिंदंबरम यांचाही निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे.
काल (18 डिसेंबर) लोकसभा आणि राज्यसभेतून एकूण 78 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं.
लोकसभेमधील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह 33 आणि राज्यसभेमध्ये काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यासह 45 खासदारांना काल (18 डिसेंबर) निलंबित करण्यात आलं होतं.
शरद पवार यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना सवाल केला आहे.

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!