सांगवी,दि.२० :-  माणसाला रागाचे दर्शन करता आले पाहिजे. स्वरांमध्ये ईश्वर शोधतो तो किराणा घराणा स्वराला गोईल आली की तो प्रकाशित होतो त्या नंतर तो सिद्धीस पावत‌ गानारा समाधिस्त होतो.

एक भारतीय म्हणून आपल्याला शास्त्रीय संगीतातील विज्ञानाचे साक्षीदार होता आले पाहिजे जो हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत शिकला त्याला जगातील कोणतेही संगीत वाजवता व गाता येते.पण हे तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा आपण स्वतःला विसरून संगीताला शरण जावू .
असे उद्गार पं.पु बालयोगी नंदकुमार महाराज स्थापित श्री दत्त आश्रम संगीत महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी किराणा घराण्याचे विख्यात गायक पं. कैवल्य गंधर्व तेज पं. कैवल्य कुमार गुरव यांनी काढले.

या प्रसंगी पं. सुधाकर चव्हाण ह.भ.प.शंकर महाराज, श्री प्रशांत शितोळे, ह.भ.प स्वरुपानंद महाराज.ह.भ.प वाघ महाराज , ह.भ.प गंभीर महाराज इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन समारंभ नंतर पं. कैवल्य कुमार गुरव यांचे गायन झाले त्यांनी राग रागेश्री रागातील बडाख्याल विलंबित एकताल बंदिश आयोरी जित राजा रामचंद्र कि लंकानगरी मे नंतर त्याच रागातील तराना.
जिवीचा जिव्हाळा प्रेमाचा पुतळा हा अभंग गायला.
दिगंबरा दिगंबरा हे भजन गायले
कबीरजी महाराज यांचे भजन गायले.
किराणा घराण्याचे जगविख्यात
गायक श्री खासायबांची प्रसिद्ध जमुना के तीर या भैरवी ने कार्यक्रमाची सांगता केली
त्यांना तबला साथ प्रशांत पांडव.
पखवाज साथ मनोज भांडवलकर
तर हार्मोनियम साथ सुरेश फडतरे यांनी केली
स्वरमंडल साथ आदित्य जोशी.
स्वर साथ वज्रकाय उदयराज कदम.तालवाद्य नागेश पवार यांनी केली.तर तानपुरा साथ श्रेयश डांगे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रा.डाॅ गजानन महाराज वाव्हळ यांनी तर आभार ह.भ.प तुकारामभाऊ महाराज यांनी मानले.

? Watch this video on Facebook
https://www.facebook.com/share/v/M2A7xv9s3kfn7SjB/?mibextid=eHQngH

 


 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!