सांगवी, दि. २१ :- प‌.पु. बालयोगी नंदकुमार महाराज स्थापित श्री दत्त आश्रम संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भारतरत्न पं.भिमसेन जोशी यांचे चिरंजीव पं.श्रीनिवास जोशी यांच्या राग पुरिया ने रंग भरला.

त्यांनी सादर केलेला विलंबित एक तालातील पियागुणवंत .हा बाडा ख्याल.व त्रितालातील. घडिये गिण जात‌. हा छोटा ख्याल रसिकांच्या पसंतीस उतरला. त्यांनी सादर केले आता कोठे धावे मन. तीर्थ विठ्ठल. या अभंग रचना ही टाळ्या मिळवून गेल्या. त्यांनी आपल्या संगीत सेवेची सांगता .सुमिरो नंदकुमार.या भैरवी ने केली.

त्यांना तबला साथ पांडुरंग पवार यांनी केली तर पखवाज साथ नंदकुमार भाडवलकर यांनी केली. हार्मोनियम साथ उमेश पुरोहित यांनी केली तानपुरा साथ मुकूंद बादरायणी, स्वप्निल रानडे यांनी केली. तालवाद्य नागेश पवार यांनी केली.
दिवसाच्या प्रथम सत्रा मध्ये श्री पांडुरंग पवार व त्यांचे शिष्य यांचे तबला सोलो वादन झाले.याच सत्रा मध्ये निवृत्ती धाबेकर यांचे अभंग वाणी झाली त्यांनी राग झिंजोटी सादर केले. दत्त दिगंबर माऊली.दत्त दत्त नाम स्मरता . सद्गुरू सारखी सोयरा .सुखाचे सागर इत्यादी रचना सादर केल्या .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ गजानन महाराज वाव्हळ यांनी केले.

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!