सांगवी, दि.२४:- श्री दत्त आश्रम संगीत महोत्सवाच्या चौथ्या दिवशी सौ राधिका जोशी व सौरभ काडगावकर या पं रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्यांचे गायण झाले. जोशी यांनी मध्यलय झपतालातील.गुरु सांत पायी हा ख्याल सादर केले त्या नंतर संभलारे ही दृत तीन ताल बंदिश सादर केली त्यांनी सादर केलेल्या निर्गुणाचे भेटी , गुरु संत कळीचा राजा,या संत रचना दाद मिळवून गेल्या.
श्री सौरभ काडगावकर यांनी आपल्या गायणाची सुरूवात राग रागेश्री नी केली. त्यांनी मध्यलय तिनतालातील “दरस कैसे पाऊ” हा ख्याल तर, द्रुत एकतालातील “देखो शाम गहलो” ही बंदीश सादर केली. त्यांनी ऒवी आणि अभंगवाणी , आम्हा नकळे ज्ञान या रचना सादर केल्या. त्यांना तबला साथ अविनाश पाटील पखवाज साथ मनोज भाडवलकर.हार्मोनियम सात उमेश पुरोहित यांनी केले. तालवाद्य नागेश पवार यांच्या केली
याच दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये पंडित सुधाकर चव्हाण गुरुजी यांचे शिष्य श्री अभयसिंह वाघचौरे यांचे गायन झाले. त्यांनी विलंबित तीन तालातील मारवा हा राग सादर केल्या.
निघालो घेऊन दत्ताची पालखी, गुरुजी मै तो, नाही पुण्याची मोजणी, आम्हा नकळे ज्ञान या रचना सादर केल्या.
त्यांना तबला साथ विष्णू गलांडे, हार्मोनियम साथ हरिभाऊ आसतकर यांनी केली सूत्रसंचालन प्रा. डॉ.गजानन महाराज वाव्हळ यांनी तर आभार समाधान जी महाराज चैतन्य यांनी केले.
Comments are closed