विशेष उपस्थिती सुप्रसिद्ध तबलावादक पं.अरविंद कुमार आझाद गुरुजी

सांगवी, २५ :- परमपूज्य बालयोगी नंदकुमार महाराज स्थापित श्री दत्त आश्रम संगीत महोत्सवाच्या पाचव्या दिवशी किराणा घराणा परंपरेतील युवा गायक पंडित रामेश्वरजी डांगे यांनी आपली सेवा सादर करताना त्यांनी सुरुवातीला विलंबित एकतालातील राग गोरख कल्याण सादर करून रसिकांची विशेष दाद मिळविली.


त्यामध्ये त्यांनी विलंबित एकतालातील “गोरे गोरे मुख पर मोहे” ही बंदिश सादर केली. दृत तीन तालातील “जोगन बने तुमरे दरस”, “येरी भाई आज पिया आये” आणि मध्यलय तीन तालातील राग बसंत बहार मध्ये “फगवा ब्रिज देखनेको चलरी” ही बंदिश श्रोत्यांच्या विशेष पसंतीस उतरली .


पंडित रामेश्वरजी डांगे यांच्या गायनाची खासियत म्हणजे त्यांचा भरदार व सुरेल आवाज आणि त्यांच्या दाणेदार जलद गतीच्या ताना यामुळे त्यांच्या गाण्यात किराणा घराण्याची खासियत आढळून आली त्यानंतर त्यांनी “तुमचा प्रसाद लाभला श्रीदत्त राया” ” बाजे रे मुरली या बाजे” आणि किराणा घराण्याच्या प्रसिद्ध “आगा वैकुंठीच्या राया” या भैरवी रागाने आपल्या कार्यक्रमाची सांगता केली. त्यावेळी आश्रमाचे प्रमुख श्री दत्त सेवक भाऊंनी आपल्या भावना व्यक्त केल्या पंडितजींच्या साथ संगतीमध्ये तबला साथ ऋषिकेशजी जगताप पखावज साथ श्री दीपकजी दसवडकर हार्मोनियम साथ श्री सुरेशजी फडतरे तानपुरा साथ गुरुजींचे शिष्य श्री नागेश पवार कु. श्रेयस डांगे आणि श्री करदाळे यांनी केली.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रामध्ये सुप्रसिद्ध तबलावादक पं.अरविंद कुमार आझाद गुरुजी यांच्या शिष्यांचे तबला सोलो वादन झाले त्यामध्ये शसौरभ गुळवणी, संदीप मुखर्जी यांनी सोलो वादन सादर केले त्यांना लेहरा साथ संगत सुरेश जी फडतरे यांनी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान चैतन्य स्वामी यांनी केले .

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!