नवी मुंबई, दि.३१ :- छावा प्रतिष्ठान नवी मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार याचे आयोजन वाशी, नवी मुंबई येथे मराठी साहित्य मंदिर हॉल या ठिकाणी करण्यात आला होते. या कार्यक्रमात 23 जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे संदीप नाईक आमदार,वैभव नाईक युवा नेते, सुभेदार कुणाल मालुसरे, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज, मुरलीकांत पेटकर पद्मश्री पुरस्कार, यश मिश्रा आय जी आय पी एस, विजय व्ही राऊत ए पी आय, किम याँग हो ग्रँड मास्टर साऊथ कोरिया, संभाजी माने प्रसिद्ध अभिनेते, बलराज माने प्रसिद्ध अभिनेते यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे, स्मिता वाल्हेकर यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अमित गडांकुश (वस्ताद) यांनी दिली.
संजय मराठे यांचे पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक कार्यामध्ये खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे आज या सभागृहात पिंपरी चिंचवडचे नाव अभिमानाने घेतले जात आहे तर स्मिता वाल्हेकरने आतापर्यंत जिल्हा,राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय अशा अनेक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अनेक सुवर्णपदक पटकवलेली आहेत म्हणून आमदार संदीप नाईक यांनी संजय मराठे आणि स्मिता वाल्हेकर यांच्याकार्याचे कौतुक करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.तसेच लॉन टेनिस या खेळात देखील आंतरराष्ट्रीय खेळाडूचा दर्जा तिने प्राप्त केलेला आहे. तिच्या यशस्वी कामगिरी पार पाडण्याकरता तिचे वडील भरत वाल्हेकर यांनी अफाट कष्ट घेतले आहेत शासन दरबारी नक्कीच अशा सामाजिक कार्यकर्त्यांची व युवा खेळाडूंची शासन दखल घेईल असे ते म्हणाले.
Comments are closed